'उद्धव ठाकरे,रश्मी ठाकरे अन् आदित्य काय आहेत हे सगळ मला माहित आहे'

Ramdas Kadam|Uddhav Thackeray| रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकार स्थापन करत त्यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र, शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान शिंदे गटात गेलेले शिवसेना नेते रामदार कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं असून ५१ आमदार गद्दार कसे होतात. गद्दार तर तुम्ही आहात. हॉस्पिटलला होतो, हात-पाय हलत नव्हते हे जे ते सांगत आहेत हे सगळं नाटक असून ही त्यांची नौटंकी आहे. मी 'मातोश्री'ची नसनस ओळखत असून उद्धव ठाकरे काय आहेत, रश्मी ठाकरे काय आहेत आणि आदित्य काय आहेत हे मला माहिती आहे,अशा शब्दात कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघात केला. कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. (Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News)

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
धनंजय मुंडे यांच्या कारखान्याकडे एक रुपयाही थकीत नाही

कदम म्हणाले की, आम्ही ५२ वर्ष सगळं भोगलं आहे. मात्र आम्ही उभा केलेला पक्ष आज पत्त्यासारखा डोळ्यसमोर कोसळतांना बघत आहे. ठाकरेंना सर्वच आयतं मिळाल असून त्यांचं शिवसेनेसाठी काय योगदान आहे. ते फक्त शिवसेनाप्रमुखांचे मुलगा आहे. इतकच आहे. त्यांनी आमच्या सुपाऱ्या दिल्या. जे शिवसेनाप्रमुख अख्ख आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढले आणि हिंदुत्व वाढवल त्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी यांनी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद मिळवलं. ते कधीही कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना खूप कमी लोकांनी ओळखलंय. मात्र मी त्यांना बरोबर ओळखून आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

बाळासाहेबांची शिवसेना आणि आजची राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव ठाकरेंची शिवसेना यात जमीन आस्मानचा फरक आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेत्यांची किंमत शून्य झाली आहे. उद्धव ठाकरे हे हुकुमशहा झाले आहेत. बाळासाहेब साधे होते पण ते हुशार होते. शिवसेना फूटण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. गद्दार तुम्ही आहात. माणूस बुडतो तेव्हा हातपाय हलवतो. या आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नसता. कारण राष्टवादीने अडीच वर्षात पराभूत आमदारांना ताकद देण्याचं काम केलं गेलं,असा आरोपही कदमांनी केला.

Uddhav Thackeray-Ramdas kadam Latest News
`..तेव्हा उद्धव ठाकरेंनी चार माणसे ठेवून खाजवून घ्यायला पहिजे होते...'

दरम्यान, पाच ते दहा तास आमदार, खासदारांना वर्षा बाहेर उभं केलं जायच कुणाला भेट द्यायची नाही. आता तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं सांगताय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि त्याच्या मुलाला संपवण्याचं कटकारस्थान तुमचं सुरू होते. त्यावेळी बैठकीत सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उदय सामंत होते. योगेशला संपवून टाका. कदम कुटुंब संपवायचं आहे असे हॉस्पिटलला दाखल असताना आदेश देत होते. उदय सामंत त्या बैठकीत होते आणि ते सगळे आता बाहेर आले असून आमच्या सोबत असल्याने ते मला सर्व सांगतात, असे कदम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in