ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले ज्यांनी धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे ; रामदास आठवलेंचा टोला

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं वक्तव्य देखील रामदास आठवले यांनी केलं आहे.
ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले ज्यांनी धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे ; रामदास आठवलेंचा टोला
Ramdas Athawale,Eknath Shinde, uddhav thackeraysarkarnama

सांगली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर संकट आहे."देवेंद्र फडणवीस यांना मी भेटून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर चर्चा करून सत्ता स्थापन करा, असं सांगणार आहे," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीवर आठवले यांनी भाष्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.(Ramdas Athawale on Eknath Shinde)

आठवले म्हणाले, "विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीला तोंड दाखवावला जागा नाही, आता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं त्यांच्यासोबत ४० आमदार आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर तोंड काळं करण्याची वेळ आली आहे. शिवसेनेत शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न होत होता. कुठलाही निर्णय न होता त्यांना गटनेतेपदावरुन काढून टाकलं आहे,"

Ramdas Athawale,Eknath Shinde, uddhav thackeray
कॉग्रेसमुळेच बंडाच्या दोन दिवसापूर्वी शिंदे-ठाकरे-राऊतांमध्ये पडली होती वादाची ठिणगी

"शिवशक्ती भीमशक्ती," असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी आधीच घेतला असता तर ही वेळ त्यांच्या वर आली नसती, असे आठवले म्हणाले. "मी फडणवीसांना विनंती करणार आहे की लवकरात लवकर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करावा," असे आठवले म्हणाले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असं वक्तव्य देखील रामदासआठवले यांनी केलं आहे. यावेळी आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले की..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या

सत्तेचे बंद केले आहे ज्यांनी धंदे

त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आहेत

बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे ,

आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे,

म्हणून आता आमच्या सोबत

येत आहेत एकनाथ शिंदे"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in