Mumbai NCP News: मुंबईसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय; राखी जाधव यांच्यावर सोपवली 'ही' जाबाबदारी

Sharad Pawar and Rakhi Jadhav : राखी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
Sharad Pawar and Rakhi Jadhav
Sharad Pawar and Rakhi Jadhav Sarkarnama

Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसही (शरद पवार गट) कामाला लागली असून मुंबईत पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) पक्षाचा मुंबई अध्यक्ष बदलत आता राखी जाधव यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती केली होती.

Sharad Pawar and Rakhi Jadhav
Ajit Pawar News : मुंबईसाठी अजितदादांचा मोठा निर्णय; दोन बड्या नेत्यांवर सोपवली 'ही' जबाबदारी

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर होती. मात्र, आता राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत, तसेच त्यांनी अजून राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला आपला पाठिंबा आहे, यासंदर्भातील भूमिका जाहीर केलेली नाही.

यातच काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका असल्याने संघटना बांधणीसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच दृष्ट्रीने आज राखी जाधव यांच्यावर मुंबईची जबाबादारी देण्यात आली आहे.

राखी जाधव नेमकं कोण आहेत ?

राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गट नेत्या आहेत. तसेच राखी जाधव या तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. या आधी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही राखी जाधव या शरद पवार गटाबरोबर एकनिष्ठ राहिल्या. त्यामुळे शरद पवारांनी आता राखी जाधव यांच्यावर मुंबईची धुरा सोपवली आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar and Rakhi Jadhav
Mumbai NCP : शरद पवार गटाची निवडणूक मोर्चेबांधणी; मुंबईचे अध्यक्षपद सोपविणार एकनिष्ठ महिला नेत्याकडे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com