राखी जाधव होणार मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्ष; मलिकांकडील कार्यभार काढण्याचा निर्णय

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मलिकांचा मंत्रीपदाचा राजीनामा न घेण्यावर पक्ष आजही ठाम आहे.
Rakhi Jadhav News, President of Mumbai NCP News, NCP News updates, Nawab Malik News
Rakhi Jadhav News, President of Mumbai NCP News, NCP News updates, Nawab Malik NewsSarkarnama

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) सध्या ईडीच्या कोठडीत आहे. मलिकांचा मंत्रीपदाचा राजीनामा न घेण्यावर पक्ष आजही ठाम आहे. पण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदाचा, तसेच पालकमंत्रीपदाचा कार्यभार इतर नेत्यांकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अध्यक्षपदासाठी पक्षाच्या नगरसेविका राखी जाधव यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्याकडे मलिकांचा कार्यभार किंवा कार्यकारी अध्यक्षपद सोपविण्यात येणार असल्याची चर्चा सिल्व्हर ओकवरील बैठकीत झाली. (Rakhi Jadhav to be president of Mumbai NCP; decision to remove presidency from Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे राज्यातील मंत्री आणि प्रमुख नेत्यांची सिल्वर ओक सध्या बैठक सुरू आहेत. त्यात मलिकांकडील अध्यक्षपद आणि पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आदी महत्वाचे नेते उपस्थित आहेत. (Rakhi Jadhav News)

Rakhi Jadhav News, President of Mumbai NCP News, NCP News updates, Nawab Malik News
भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवार यांची भेट निघून गेले आहेत. नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतरही त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नये, अशी भूमिका आजच्या बैठकीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते. मात्र, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील मुंबई अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याबाबत या बैठकीत खलबंत झाली. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभार पक्षाच्या नगरसेविका राखी जाधव यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या नावाबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे.

Rakhi Jadhav News, President of Mumbai NCP News, NCP News updates, Nawab Malik News
‘मकाई’ची पुण्याई कामी येणार...बागल गटाला बहिणभावांची धडपड नवसंजीवनी देणार?

मंत्री नवाब मलिक यांच्या जागी अध्यक्षपदावर किंवा कार्यकारी अध्यक्षपदी राखी जाधव यांची नवी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com