ऑफरचा खेळ संपला...आता रंगणार घोडेबाजाराचे मैदान!

कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भारतीय जनता पक्षाकडून (BJP) परस्परांना उमेदवार मागे घेण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, दुपारी तीनपर्यंत कोणीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे सकाळपासून रंगलेला ऑफरचा खेळ एकदाचा संपला आणि आता थेट निवडणुकीचा सामना रंगणार आहे. त्यात घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Rajya Sabha elections will be held as no party has withdrawn)

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपला विधान परिषदेच्या अतिरिक्त एका जागेची ऑफर देण्यात आली होती. मात्र, ती ऑफर फेटाळून लावत भाजपनेही महाविकास आघाडीला तीच ऑफर दिली होती. त्यामुळे राज्यात ऑफरचा खेळ रंगला होता. मात्र, दोन्हीकडून नुसत्याचा ऑफर देण्यात आल्या, मात्र त्या कोणीही स्वीकारल्या नाहीत. दुपारच्या तीनपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक अखेर लागली आहे.

Rajya Sabha Election 2022
महाआघाडी सोबतच्या बैठकीनंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी भाजप नेत्यांना दिला हा निरोप....

भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत, तर शिवसेनेकडून दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. शिवसेना आणि भाजपकडेही दुसरा आणि तिसरा उमेदवार जिंकण्याएवढी मते नाहीत, त्यामुळे ही निवडणूक अपक्ष आमदारांच्या हाती असणार आहे. तेच या निवडणुकीतील खरे सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे.

Rajya Sabha Election 2022
पिंपरी-चिंचवडची जबाबदारी मिळताच अजितदादांनी लावला कामाचा धडाका!

महाविकास आघाडीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीकडून भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याबदल्यात भाजपला विधान परिषदेची एक वाढीव जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, भाजपने ती ऑफर फेटाळून लावत तीच ऑफर महाविकास आघाडीला दिली आहे, त्यामुळे कोण माघार आणि कोण बिनविरोध होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rajya Sabha Election 2022
लबाड्या करणाऱ्या दूध संघाच्या संचालकांना जेलमध्ये पाठवा : मोहितेंची केदारांकडे मागणी

महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशी त्यांना आघाडीची काळजी आहे, तशी आम्हालाही आमच्या पक्षाची काळजी आहे. आमची काही ध्येयधोरणं, प्रघात, पायंडे आहेत. मुळात पार्टीचा एबी फॉर्म लावलेला तिसरा उमेदवार मागे घेणे, हे मुळात आमच्या पातळीवर शक्यच नाही. कारण आम्हाला सहकाऱ्यांशी आणि दिल्लीशी बोलावे लागेल. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘तुमची भूमिका बरोबर आहे आणि यू गो दिस स्टॅण्ड...’

‘‘राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही भाजपला केली होती. त्याबदल्यात आम्ही विधान परिषदेची एक जागा वाढीव देतो, अशी ऑफर आम्ही महाविकास आघाडीकडून भाजपला दिली आहे,’’असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com