...तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान मारणार! बच्चू कडूंनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे.
CM Uddhav Thackeray, State Minister Bacchu Kadu Latest Marathi News
CM Uddhav Thackeray, State Minister Bacchu Kadu Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : भाजपसह शिवसेनेने राज्यसभेच्या निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांसाठी प्रत्येक मत लाखमोलाचा ठरणार असल्याने रणनीती आखली जात आहे. पण त्यातच आता शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार क्रांती संघटनेनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे टेन्शन वाढवलं आहे. (Rajy sabha Elelction Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरदार केली आहे. प्रामुख्याने सहाव्या जागेसाठी भाजप व महाविकास आघाडीत रस्सीखेच आहे. बच्चू कडू यांच्या संघटनेचे दोन आमदार आहेत. सरकार स्थापनेवेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची मतं शिवसेनेच्या पारड्यात पडतील, हे निश्चित आहे. पण कडू यांनीच आता शिवसेनेला इशारा दिला आहे. (State Minister Bacchu Kadu warns Mahavikas Aghadi)

CM Uddhav Thackeray, State Minister Bacchu Kadu Latest Marathi News
मी मोदी किंवा अमित शहा नाही! रामराजेंचा रणजितसिंहांवर पलटवार

काय म्हणाले बच्चू कडू?

संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख आहे. धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी हात वर करत असल्याचा दावा कडू यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार कुचकामी ठरत असेल तर एका हेक्टरला चार हजार रुपयांची मदत धान व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे. हे झाले नाही तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या पाच मिनिटांवर मारणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

CM Uddhav Thackeray, State Minister Bacchu Kadu Latest Marathi News
राष्ट्रवादीच्या विद्या लोलगेंचा प्रताप; घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री उघड

मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांना गळ घालतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना आणि शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

CM Uddhav Thackeray, State Minister Bacchu Kadu Latest Marathi News
चूक करणाऱ्याला निलंबित करा! अजितदादांनी मनिषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापलं!

महाविकास आघाडीकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. तर जिंकण्यासाठी आघाडीला १६ मतांसाठी अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं आहेत, तर इतर ७ आमदारांचा पाठिंबा पाहता एकूण २९ मते भाजपकडे आहेत. भाजपला जिंकण्यासाठी १३ मतांची गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर भाजपचा डोळा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com