महाविकास आघाडीला मोठा धक्का : देशमुख, मलिकांना मतदान करता येणार नाही ?

अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगीला ईडीने (ED)विरोध दर्शवला आहे.
महाविकास आघाडीला मोठा धक्का : देशमुख, मलिकांना मतदान करता येणार नाही ?
nawab malik, anil deshmukh sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटू नये, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असलेल्या महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्या कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा मतदानाचा अधिकार धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार नसल्याचे बोलले जात आहे.(Rajya Sabha Election latest news)

राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) १० जून रोजी होणार आहे. राज्यात २४ वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.शिवसेना आणि भाजप यांच्यात सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार तयारी केली आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल झाले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी परवानगीला ईडीने (ED)विरोध दर्शवला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

nawab malik, anil deshmukh
Rajya sabha Election : मतदानासाठी आमदारांना या नियमाचं पालन करावं लागतं..

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कळवण्याची माहिती सूत्रांची दिली आहे. महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली तर गणित बिघडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रवादीचे (NCP) नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदानाचा अधिकार धोक्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभेसाठी मतदानसाठी परवानगी मिळावी यासाठी देशमुख, मलिक यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केले आहेत.

मतदानाला बाहेर जाता येणार नाही :ईडी

दोन्ही नेत्यांच्या या अर्जावर ईडीने कायद्याचा हवाला देत मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे म्हटले आहे. ईडीने १९५१ कलम ६२(५) चा हवाला दिला आहे. 'जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, असं ईडीनं म्हटलं आहे.

लाखो रुपयांची उधळण

कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झालं आहे. फक्त एका खासदारासाठी राज्यातील विधानसभा आमदारांवर आता सर्वच पक्ष लाखो रुपयांची उधळण करणार आहे. मतदानाआधी आपले आमदार सुरक्षित राहावे यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in