राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे फिरवली पाठ

तब्येत ठीक नसल्याने बनसोडे विधान भवनात आले नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे फिरवली पाठ
Anna Bansode News, Rajya Sabha Election 2022 latest newssarkarnama

पुणे : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक एक मत महत्वाचे आहे. त्यामुळे भाजप,आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode), व दिलीप मोहिते पाटील हे नाराज असल्यामुळे मतदानास उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात होते. (Rajya Sabha Election 2022 latest news)

दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी पक्षश्रेष्ठींनी दूर केल्याने त्यांनी मतदान केले आहे, मात्र बनसोडे यांनी मतदान केले नसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे मुंबईत आहेत, मात्र विधान भवनात नाहीत. तब्येत ठीक नसल्याने बनसोडे विधान भवनात आले नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

 Anna Bansode News, Rajya Sabha Election 2022 latest news
Rajya Sabha Election LIVE : लक्ष्मण जगताप कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना

'आमच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही,' यावरुन नाराज असलेले राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite) यांची नाराजी दूर झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहिते पाटलांनी आश्वासन दिल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. (Rajya Sabha Election LIVE update)

"पक्षाच्या संपर्कात आहे," असे मोहिते पाटील यांनी सांगितले. राज्यसभेच्या निवडणूक बैठकीत मोहिते पाटील उपस्थित नव्हते, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. आज सकाळी नऊ वाजता मतदानास सुरवात झाली आहे. सर्वात आधी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी मतदान केलं . दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सांयकाळी सहा वाजता निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

धनंजय मुंडेंना फोटो घेण्याचा मोह..

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे नेहमीच आपल्या वेगळेपणासाठी चर्चेत असतात. आज समुद्र किनाऱ्यावरून निवासस्थानी जाताना, मुंबई शहराचे स्वच्छ आकाश व सुंदर रूप पाहून त्यांनी केलेली फोटोग्राफी चर्चेचा विषय ठरली आहे सकाळी राज्यसभेसाठी मतदान करून परत येत असताना, मुंबई नगरीचे हे मोहक रूप पाहून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना फोटो काढायचा मोह आवरला नाही. त्यांनी समुद्रकिनारी चटकन आपल्या चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले व मुंबई नगरीच्या या मोहक साजाचे प्रतिबिंब आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in