Rajyasabha Election: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांना भेटणार

Rajyasabha Election | Mahavikas Aghadi| Devendra Fadanvis| विधिमंडळातील सध्याचं संख्याबळ पाहता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून २०२२ रोजी निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चूरस वाढली आहे. पण विधिमंडळातील सध्याचं संख्याबळ पाहता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशात राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघडी शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार न होता ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आज (३ जून) सकाळी दहा वाजता मंत्री छगन भुजबळ, खासदार अनिल देसाई, मंत्री सुनील केदार, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दरम्यान राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीचे चित्र आज दुपारी स्पष्ट होणार आहे.

Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
वाझे माफीचा साक्षीदार होताच देशमुख झाले मुख्य आरोपी ; CBIकडून आरोपपत्र दाखल

राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पण यात ठाकरे सरकार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार देऊन शिवसेनेला धक्काच दिला. शिवसेनेने उमेदवारी दिलेले संजय पवार यांच्यासमोर निवडून येण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

भाजपकडून आज पीयूष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.

एक खासदार निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज असते. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची शिल्लक मते शिवसेनेला मिळणार आहेत. पण यात किंगमेकर ठरणार आहेत ते अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार. त्यामुळे ठाकरे सरकार फडणवीसांवर भारी पडतात की फडणवीस शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करणार, हे आता राज्यातले २९ आमदारच ठरवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com