जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपचा आक्षेप

मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
Jitendra Awhad News, Yashomati Thakur News, Rajya Sabha Election 2022 News
Jitendra Awhad News, Yashomati Thakur News, Rajya Sabha Election 2022 NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केलेल्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला. यामुळे काही काळ विधानभवनात गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली, त्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार आणि पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे.

मतपत्रिका दाखवायची असते, ती हाताळायला द्यायची नसते, असा निवडणुकीचा नियम आहे. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Jitendra Awhad News, Yashomati Thakur News, Rajya Sabha Election 2022 News
राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे फिरवली पाठ

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे त्यांना मतपत्रिका बदलून देण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदान केलं. शिक्का नसलेली मतपत्रिका कशी आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भाजपने घेतलेले सर्व आक्षेप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेटाळले आहेत.

दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी पक्षश्रेष्ठींनी दूर केल्याने त्यांनी मतदान केले आहे, मात्र अण्णा बनसोडे यांनी मतदान केले नसल्याचे समजते. राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे मुंबईत आहेत, मात्र विधान भवनात नाहीत. तब्येत ठीक नसल्याने बनसोडे विधान भवनात आले नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

Jitendra Awhad News, Yashomati Thakur News, Rajya Sabha Election 2022 News
Rajya Sabha Election LIVE : लक्ष्मण जगताप कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे रवाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com