राज्यसभा निवडणूक : डहाणूचे आमदार निकोले यांचा महाआघाडीला पाठिंबा

माकपने राज्यात महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेवेळी पाठिंबा दिला होता
 Vinod Nikole
Vinod NikoleSarkarnama

विरार : महाविकास आघाडी (mahavikas Aaghadi) विशेषतः शिवसेनेला (Shivsena) दिलासा देणारी बातमी डहाणूमधून आली आहे. डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. माकपने राज्यात महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेवेळी पाठिंबा दिला होता, त्यामुळे माकपचे आमदार निकोले यांच्या पाठिंब्याच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाला दिलासा मिळाला आहे. (Rajya Sabha Election: Dahanu MLA Vinod Nikole's support to mahavikas Aaghadi)

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत एकेका मतांसाठी रस्सीखेच सुरु आहे. पालघर जिल्ह्यातील माकपचे एकमेव आमदार असलेल्या विनोद निकोले यांनी महाविकास आघाडीला आज पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीला माकपने सत्ता स्थापनेच्या वेळी पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्य सभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला माकपने पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने निकोले यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. एका एका आमदाराला आपल्या बाजूकडे वळविण्यासाठी दोन्ही पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच निकोले यांचा निर्णय शिवसेनेला दिलासा देणारा ठरला आहे.

दुसरीकडे बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे पाठबळ मिळावे, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आज सायंकाळी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये येऊन भेट घेतली. तत्पूर्वी भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी काल विरारमध्ये जाऊन ठाकूर यांच्या पाठिंब्यासाठी विनंती केली होती. मात्र, ठाकूर यांनी आपला पाठिंबा किंवा कल जाहीर केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची भाजप आणि शिवसेनेला प्रतीक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com