महाडिकांच्या विजयासाठी भाजपने टाकला मोठा डाव ; गिरीश महाजनांसह शेलार, लाड मैदानात

Dhananjay Mahadik | BJP | Rajya Sabha | : धनंजय महाडिकांचीही पायाला भिंगरी
महाडिकांच्या विजयासाठी भाजपने टाकला मोठा डाव ; गिरीश महाजनांसह शेलार, लाड मैदानात
Girish mahajan, Ashish shelar Prasad lad sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना (Shivsena) आणि भाजपने (BJP) प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना रिंगणात उतरविल्यानंतर या जागेवर भाजपनेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. भाजपने यापूर्वी या राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. (Rajya sabha Election latest news)

याशिवाय भाजपने आता राज्यातील तीन नेत्यांनाही मैदानात उतरवलं आहे. राज्यसभेत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने तीन महत्वाच्या नेत्यांकडे दिली आहे. आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan), आशिष शेलार (Aashish Shelar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) या तीन नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आली असून, हे तिन्ही नेते कामाला देखील लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

भाजप, मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपचे संख्याबळ ११३ आहे. त्यामुळे भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊन भाजपकडे २७ मते शिल्लक राहतात. त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर भाजपला आणखी १३ मतांची गरज आहे. ती जुळवणे भाजपसाठी मोठं आव्हान असेल. याचमुळे भाजपने याचा अनुभव असलेल्या नेत्यांकडे जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे. (Rajya sabha Election latest news)

म्हणून हे तीन नेते भाजपने निवडले

भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची ओळख संकटमोचक अशी बनली होती. कोणताही विषय असो त्यावेळी गिरीश महाजन संकटमोचकाप्रमाणे फडणवीस सरकारची बाजू भक्कम करायचे. याचमुळे भाजपने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असण्याची शक्यता आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांनी चमकदार कामगिरी केली होती. आता त्यांना राज्यसभेची मोहीम दिली आहे. तर निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. आता हे त्रिमूर्ती भाजपला विजय मिळवून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान सहाव्या जागेसाठी मैदानात उतरलेले भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनीही आता राजकीय गोळाबेरजेला सुरवात केली आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) हितेंद्र ठाकूर यांची आज विरारमध्ये भेट घेतली. बविआचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याकडं वळवण्यात महाडिक यशस्वी झाले असल्याची चर्चा आहे. याचा फटका महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in