उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

Rajya Sabha Election 2022| BJP-Shivsena| महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
Rajya Sabha Election 2022

Rajya Sabha Election 2022

येत्या १० जून २०२२ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा जागा आहेत. पण महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आणि विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेचे संजय पवार यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अर्ज भरला आहे. भाजपच्या धनंजय महाडिक यांनीदेखील अर्ज भरला आहे. त्यामुळे महाडिक उमेदवारी मागे घेतात की ही लढत होणार, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

राज्यसभेसाठी भाजपने आपले तीन उमेदवार मैदानात उतरवले असून महाविकास आघाडीने चार उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार का? याची चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घेतला तर भाजपदेखील विधान परिषदेसाठी फक्त चार उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेलाही एक पाऊल मागे जाऊन राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी लागेल.

विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करत असतात. त्यामुळे सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळ पाहता भाजपचे दोन उमेदवारांचा सहज विजय होऊ शकतो. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी होऊ शकतो. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहाव्या जागेवर जिंकण्याची शक्यता आहे. पण भाजपला सहाव्या जागेसाठी 13 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाली तर ही लढच चुरशीही होईल असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in