Rajya Sabha Election 2022: भाजप तिसरी जागा लढण्यावर ठाम, ऑफर नाकारली

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल... (Rajya Sabha Election 2022)
Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election 2022sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election 2022) अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत.

महाविकास आघाडीची ऑफर भाजपने स्वीकारली नसल्याची माहिती समोर येत आहे. भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Rajya Sabha Election 2022
भाजप नेत्यांचे स्वप्न भंगले ; मुलांना तिकीटे नाहीत, 'संघटनात्मक काम करा, मगच तिकीट'

भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. मात्र, भाजपने ही विनंती अमान्य केली असून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल

सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ

राष्ट्रवादी - 53

काँग्रेस - 44

शिवसेना - 55

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पार्टी - 2

प्रहार जनशक्ती पार्टी - 2

माकप - 1

शेकाप - 1

स्वाभिमानी पक्ष - 1

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1

अपक्ष - 9

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com