ओवेसी यांचा पक्ष आता महाविकास आघाडी (MVA) उमेदवाराला मतदान करणार आहे. आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, "भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील."