Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु..

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून २०२२ रोजी निवडणूक होत आहे.
Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये  रस्सीखेच सुरु..
Rajyasabha Election sarkarnama

निवडणूक बिनविरोध होण्याचे प्रयत्न अयशस्वी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. 

फडणवीसांकडून सकारात्मक प्रतिसाद -छगन भूजबळ

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्ठमंडळ आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली.

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्यात येईल, असा आघाडीचा प्रस्ताव

भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम, आघाडीची ऑफर नाकारली

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

आघाडीचे शिष्टमंडळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
आघाडीचे शिष्टमंडळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस sarkarnama

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ शिवसेना - 55 राष्ट्रवादी - 53 काँग्रेस - 44 बहुजन विकास आघाडी - 3 समाजवादी पार्टी - 2 प्रहार जनशक्ती पार्टी - 2 माकप - 1 शेकाप - 1 स्वाभिमानी पक्ष - 1 क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 अपक्ष - 9

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवाराने माघार घेतली नाही तर अटीतटीची ही लढत होणार आहे.

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in