मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही वाढलाय भाव...

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election 2022) प्रत्येक आमदाराची भाजप आणि महाविकास आघाडीला गरज
Raju Patil, Raj Thackeray
Raju Patil, Raj Thackeray Sarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठीच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha election 2022) सातवा उमेदवार रिंगणात आल्याने छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्याही मताला मोल आले आहे. राज ठाकरे यांच्याशी बोलून हे मत भाजप खेचणार की शिवसेनेचा बडा नेता पाटलांना गळाला लावणार, याची उत्सुकता राहणार आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी मनसे तटस्थ होती. त्यांनी सरकारच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केले नाही. आता गेल्या अडीच वर्षांत मनसेने कूस बदलली आहे. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून लक्ष्य केले. त्यांच्या या भूमिकेने भाजपने सहर्ष पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज हे अयोध्येला देखील जाणार होते. तेव्हापासून भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषणसिंग यांनी राज यांच्या अयोध्या भेटीला जाहीर विरोध करून राज यांची कोंडी केली. राज यांना दौरा रद्द करावा लागला. दौरा रद्द करण्याची घोषणा करताना राज यांनी भाजपच्या नेत्यांवर त्यातही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्यावर टीका केली.

Raju Patil, Raj Thackeray
राज्यसभा निवडणूक: आमदाराने व्हीप मोडल्यास सदस्यत्व जाणार? त्याच्या मताचे काय होणार?

आता या साऱ्या परिस्थितीत राज हे कोणाच्या जवळ जाणार, हे या निमित्ताने कळणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपला त्या मताची आशा आहे. महापालिका निवडणुकांत मनसे आणि भाजप अशी युती होणार असल्याची चर्चा होत असते. त्याची चुणूक राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने दिसून येणार आहे.

Raju Patil, Raj Thackeray
१९९८ ची राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला अन् शरद पवार आरोपांचे धनी झाले

राजू पाटील आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात खटके उडत असतात. त्याचाही विचार पाटील करतील. अर्थात राजकारणात उघडपणे जे दिसते ते तसेच असते, असेही समजण्याचे कारण नाही. अपक्ष किंवा एकटा आमदार असलेल्या व्यक्तीला कोणाला मत दाखवायची गरज नसते. त्यामुळे राजू पाटील कोणाच्या गळाला लागणार, याची उत्सुकता राहणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल

सत्ताधारी महाविकास आघाडी संख्याबळ

शिवसेना - ५५

राष्ट्रवादी - ५३

काँग्रेस - ४४

बहुजन विकास आघाडी - ३

समाजवादी पार्टी - २

प्रहार जनशक्ती पार्टी - २

माकप - १

शेकाप - १

स्वाभिमानी पक्ष - १

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - १

अपक्ष - ९

सत्ताधारीकडे एकूण संख्याबळ- १७२

Raju Patil, Raj Thackeray
राज्यसभा निवडणूक : या नियमामुळे राष्ट्रवादीची दोन मते धोक्यात; 'मविआ'चे टेन्शन वाढले...

विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ

भाजप - १०६

जनसुराज्य शक्ती - १

राष्ट्रीय समाज पक्ष - १

अपक्ष - ४

विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - ११२

भूमिका उघड न केलेले पक्ष

एमआयएम - २

मनसे - १

एकूण तटस्थ- ३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com