व्वा गडकरी साहेब, ऊस उत्पादकाने आत्महत्या केलेली केव्हाही चांगली...

एफआरपी पेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार (Sugar Factory) आत्महत्या करतील..
Raju Shetty, Nitin Gadkari
Raju Shetty, Nitin Gadkarisarkarnama

पुणे : केवळ साखरेचे उत्पादन करून यापुढे चालणार नाही. ऊसापासून उपपदार्थांच्या निर्मितीत आपण कमी पडलो आणि असाच ऊस (Sugarcane) लावत राहिलो तर एक दिवस ऊस उत्पादक शेतकऱ्यालादेखील आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला होता. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, व्वा! गडकरी साहेब..एफआरपी पेक्षा जास्त रक्कम दिली तर साखर कारखानदार (Sugar Factory) आत्महत्या करतील.. शेतकऱ्याला स्वत:च्या शेतातील उसापासून इथेनॅाल तयार करायला परवानगी दिली तरीही साखर कारखानदार आत्महत्या करतील. शेतकऱ्याने शेतातील उसापासून स्वत: इथेनॅाल तयार करुन ट्रॅक्टरसाठी वापरले तर पेट्रोलियम कंपनीवाले आत्महत्या करतील...

पाकिस्तानातील साखर आयात थांबवली तर तुमचे उद्योजक मित्र आत्महत्या करतील...आजारी पाडलेला सहकारी साखर कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला तर तुमचे राजकीय मित्र आत्महत्या करतील... यापेक्षा ऊस उत्पादकाने आत्महत्या केलेली केव्हाही चांगलीच नाही का? अशी उपहासात्मक टीका राजू शेट्टी यांनी गडकरी यांच्यावर केली आहे.

Raju Shetty, Nitin Gadkari
मोठा भाऊ कोण, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलंय : फडणविसांनी सेनेला डिवचलं

सोमवारी नितीन गडकरी सोलापूर जिल्ह्या दौऱ्यावर होते. यावेळी गडकरी म्हणाले होते, नव्या स्वरूपातील दुचाकींचे इंजिन फ्लेक्स इंजिन बनत आहेत. दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांनी तशी तयारी केली आहे. शंभर टक्के इथेनॉलवर या दुचाकी चालू शकतील. जिल्ह्यातील कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनाच्या मागे न लागता इथेनॉलचे उत्पादन घेतले पाहिजे. जिल्ह्यात बनविलेल्या इथेनॉलचा खप जिल्ह्यातच होणार आहे. इथेनॉलचे उत्पादन कारखानदार व शेतकरी दोघांच्या हिताचे आहे. येणारा काळ इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायोएलएनजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजनचा आहे. त्यानुसार कारखानदार आणि शेतकऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.

Raju Shetty, Nitin Gadkari
गडकरींकडून होणाऱ्या रस्त्यांच्या कामात सोलापूर जिल्हा राज्यात नंबर वन !

टोयोटाची नवी गाडी ४० टक्के वीज आणि ६० टक्के बायोइथेनॉलवर चालनार आहे. माझ्याकडे ग्रीन हायड्रोजची गाडी आहे आणि ती मर्सिडीजपेक्षा ही चांगली आहे. त्यातून धूर ही निघत नाही आणि आवाज ही येत नाही फक्त पाण्याचे थेंब निघतात त्यामुळे ग्रीनहायड्रोजन हे आपले भविष्य आहे. साखर कारखादारी टिकण्यासाठी कारखानदारांनी ग्रीनहायड्रोजनमध्ये शिरले पाहिजे. साखरेबरोबरच सर्व प्रकारचे को-जनरेशन केले नाही तर साखर कारखानदारी टिकणार नाही, असे गडकरी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in