Rajinikanth News : रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा; फोटो शेअर करत आदित्य म्हणाले…

Aditya Thackeray News : दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Rajinikanth, Uddhav Thackeray News
Rajinikanth, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Rajinikanth, Uddhav Thackeray News : दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' वर जाऊन ठाकरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात मोठा चर्चा सुरू आहे.

ही कोणतीही राजकीय भेट नसून फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. याआधीदेखील रजनीकांत मुंबई दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख (Shivsena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

Rajinikanth, Uddhav Thackeray News
karnataka Congress : काँग्रेस उमेदवाराची पहिली यादी बुधवारी जाहीर होणार ; ६१ विद्यमान आमदारांना..

२००८ मध्ये 'रोबोट' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रजनीकांत मुंबईत आले होते. तेव्हा त्यांनी 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच रजनीकांत यांनी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

रजनीकांत 'मातोश्री'वर आल्यानंतर ठाकरे कुटुंबाने त्यांच्यासोबत फोटो काढला. हा फोटो आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) ट्वीटरवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदित्य यांनी लिहिले की ''रजनीकांत जी पुन्हा एकदा 'मातोश्री'वर आल्याने खूप आनंद झाला.''

Rajinikanth, Uddhav Thackeray News
Sunil Kedar : फडणवीसांच्या कार्यक्रमात काळी फीत लावून बसले सुनील केदार, कारण...

दरम्यान, रजनीकांत यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे निमंत्रण देण्यात आले होते. हा सामना पाहण्यासाठी रजनीकांत काल (१७ मार्च) मुंबईत आले होते. कालच्या सामन्याइतकीच रजनीकांत यांच्या उपस्थितीचीही खूप चर्चा झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com