खासदार मंडलिकांना आवरुन येतो म्हणाले अन् यड्रावकर थेट गुवाहटीमध्येच दिसले...

Shivsena | Rajendra Patil-Yadravkar |Sanjay Mandlik : मंत्री राजेंद्र पाटील गुवाहटीला पोहचण्याची नाट्यमय कहाणी...
Rajendra Patil-Yadravkar |Sanjay Mandlik
Rajendra Patil-Yadravkar |Sanjay MandlikSarkarnama

कोल्हापूर : आपण शिवसेनेसोबतच आहे, पक्षप्रमुखांनी मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला हजर राहणार आहे, असे कालपर्यंत सांगत असलेले शिरोळचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार आणि राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil -Yadravkar) हेही काल रात्री उशीरा सुरतमध्ये पोहचले. तिथे ते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या गोटात दाखल झाले. तिथून आज पहाटे सर्वांसोबत गुवाहाटीला रवाना झाले. त्यामुळे शिंदे यांच्या भूमिकेला आता मंत्र्यांचाही पाठिंबा असल्याचे दिसत आहे.

काल यड्रावकर यांना मुंबईला घेऊन येण्याची जबाबदारी कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर होती. त्याप्रमाणे काल रात्री मंडलिक हे मंत्री यड्रावकर यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत दाखल होताच आवरून येतो असे सांगत मंडलिक यांच्या गाडीला चकवा देवून यड्रावकर यांनी सुरत गाठली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार यड्रावकर शिरोळ मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्ट्र कार्यकर्ते, त्यातही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणूनही त्यांची ओळखले जायचे. पण विधानसभेच्या जागा वाटपात शिरोळची जागा आघाडीतील घटक पक्षाला गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र विजयानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेल्या यड्रावकर यांना राज्यमंत्री पदाची लॉटरीही लागली.

Rajendra Patil-Yadravkar |Sanjay Mandlik
४ वेळचे आमदार आणि २ वेळचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही एकनाथ शिंदेंचे पाय धरले

दरम्यान सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरत गाठली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यामुळे शिवसेनेने पक्षांसह पाठिंबा दिलेल्या आमदारांना मुंबईत येण्याचे आवाहन केले होते. याची जबाबादारी काही खासदारांवर सोपवण्यात आली. यड्रावकर यांना मुंबईला आणण्याची जबाबदारी मंडलिक यांच्यावर होती, त्याप्रमाणे मंडलिक हे यड्रावकर यांना घेऊन मुंबईत दाखल झाले. तिथे गेल्यानंतर आवरून येतो असे सांगत यड्रावकर यांनी मंडलिक यांना चकवा देत मध्यरात्रीच कारने सुरत गाठले. आज पहाटे इतर आमदारांसोबत ते गुवाहाटीला पोहचले.

Rajendra Patil-Yadravkar |Sanjay Mandlik
एकनाथ शिंदेंचा पहिला मास्टरस्ट्रोक; सुनील प्रभूंची मुख्य प्रतोदपदावरून उचलबांगडी

जिल्हा बँकेचे सहा संचालक विधानसभेत विजयी झाले आहेत. या विजयानंतर जिल्हा बँकेत आयोजित सत्कार समारंभात प्रा. मंडलिक यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना निवडून आणायचे हे ठरले होते असे खळबळजनक वक्तव्य केले होते. जिल्ह्यातील ५ सेनेच्या आमदारांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. मंडलिक यांच्या वक्तव्याने या पराभूत आमदारांतही नाराजी होती. जिल्हा बँकेच्या राजकारणातून मंडलिक व यड्रावकरांच्या असलेल्या मैत्रीतून त्यांच्यावर यड्रावकर यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in