Rajan Vichare: शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप, ठाकरे गटाच्या खासदाराची उच्च न्यायालयात धाव

Rajan Vichare Vs Shinde Fadnavis Government : उध्दव ठाकरेंना पाठिंबा देणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न...
Eknath Shinde | Rajan Vichare
Eknath Shinde | Rajan VichareSarkarnama

MP Rajan Vichare Vs Shinde Fadnavis Government : ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे नेते असल्यानं आपल्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी राज्य सरकारने ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेतील कपातीवर आक्रमक पावित्रा घेतला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत विचारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray) ना पाठिंबा देणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून सुरु असून खासदार,आमदारांना धमकावण्यापर्यँत त्यांची मजल पोहचली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांची गळचेपी करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग सुरु असल्याचा आरोपही विचारेंनी याचिकेद्वारे केला आहे.

Eknath Shinde | Rajan Vichare
Chitra WaghNews; औरंगाबादचे नामकरण धर्मवीर संभाजीनगर करा

एकनाथ शिंदे गटातील खासगी सचिव, कार्यकर्त्यांना तसेच ज्यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाही, पण ते शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना सरकारी तिजोरीतून खर्च करुन सुरक्षा पुरविण्यात येत आहे. याचवेळी ठाकरे गटातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. विचारे यांच्या सुरक्षेत कपात करुन त्यांच्यासेवेसाठी केवळ एक हवालदार तैनात आहे.

Eknath Shinde | Rajan Vichare
Laxman Jagtap : ...अन् लक्ष्मणभाऊंचं मंत्री व्हायचं स्वप्नं अपूर्णच राहिलं!

उध्दव ठाकरेंना पाठिंबा देणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून सुरु असल्याचा आरोप देखील विचारे यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाच्या खासदार आमदारांना धमकावण्यापर्यँत त्यांची मजल पोहचली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांची गळचेपी सरकार संपूर्ण सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही विचारेंनी केला आहे.

सुरक्षा पूर्ववत करण्याचीही मागणी

आपली सुरक्षा पूर्ववत करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी विचारेंनी याचिकेद्वारे केली आहे. तसेच निर्भया पथकातील सर्व पोलस ठाण्यांना परत करण्याचे आदेश देखील न्यायालयाने सरकारला द्यावेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in