Raja Dixit Resignation : मंत्र्यांच्या आश्वासनानंतर डॉ. दीक्षित, डॉ. मोरे दोन पावले मागे!

Raja Dixit Resignation : हा आमचा नैतिक विजय!
Raja Dixit Resignation | Sadanand more
Raja Dixit Resignation | Sadanand moreSarkarnama

पुणे : राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. राज्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या दोघांची पुण्यात भेट घेत त्यांच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. दीक्षित आणि डॉ. मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेतल्याने या नाट्यावर अखेर पडदा पडला.

सरकारच्या भाषा विभागाने आणि वित्त विभागाने गेली वर्षभर अडवणूक केल्याचा आरोप डॉ. दीक्षित यांनी जाहीर पत्राद्वारे केला होता. विश्व मराठी संमेलनातही जाणीवपूर्वक डॉ. दीक्षित व डॉ. मोरे यांना डावलले गेल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दोघांनीही गुरुवारी (ता. १२) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या नाराजीची दखल घेत केसरकर यांनी तातडीने पुण्याला येऊन या दोघांची भेट घेतली.

Raja Dixit Resignation | Sadanand more
Uorfi Javed : उर्फीने भेट घेतल्यानंतर काय म्हणाल्या रूपाली चाकणकर?

डॉ. मोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत केसरकर यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. ‘तुम्हा दोघांचे काम अतिशय चांगले आहे, हे मी यापूर्वीही जाहीरपणे सांगितले आहे. तुमच्यासारखी माणसे या दोन संस्था उत्तमरित्या चालवण्यासाठी आवश्यक आहेत. तुमच्या सर्व अडचणींचे निवारण केले जाईल, तसेच कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही’, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यांच्या विनंतीला मान देत डॉ. दीक्षित आणि डॉ. मोरे यांनी राजीनामा मागे घेतला.

Raja Dixit Resignation | Sadanand more
Satyajeet Tambe News; तांबेचा डाव हा तर प्री प्लॅन मिशन लोटस!

यानंतर राजा दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी दिलेला राजीनामा ही एक नैतिक कृती होती. राजकारण आणि नितीकारण यात अंतिम विजय नितीचाच होतो, असा मला नेहमीच विश्वास आहे. त्यामुळे जे काही घडले, तो मला नैतिकतेचा विजय वाटतो, असे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले. विनाअडथळा काम करता येणार असेल, तर त्यास माझी काहीही हरकत नव्हती. त्यामुळे आश्वासनानंतर राजीनामा मागे घेतला. मंडळाच्या कामासाठी अनेक योजना विचाराधीन आहेतच. त्या विधायकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असेही दीक्षित म्हणाले.

या विषयावर सदानंद यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत आमच्या अडचणी व तक्रारी जाणून घेतल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे," असे मोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in