CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray News
CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray NewsSarkarnama

सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही : राज यांचा खणखणीत इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र

मुंबई : माझे एकच सांगणे आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही! असा स्पष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. (Raj Thackeray Latest News)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नियमीत शाब्दीक खटके उडत असतात. राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या सभेमधून अनेकदा निशाणा साधला आहे. मात्र, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या राज यांच्या सभेमध्ये त्यांनी मशिदींवरील भोंग ४ मेपर्यंत काढा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावणार, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचाही सध्या पोलिस शोध घेत आहेत, या सर्व प्रकारानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक होत उद्धव ठाकरे यांना थेट इशारा देत तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, असे म्हटले आहे.

CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray News
पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडं पहा... मनसे आमदाराचे एकनाथ शिंदेंना भावुक पत्र

राज ठाकरे पत्रात म्हणाले, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

CM Uddhav Thackeray Latest News in Marathi, Raj Thackeray News
महागाईची किंमत लोक केंद्राकडून योग्यवेळी वसुल करतील...शरद पवार

गेल्या आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदिंमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com