Raj Thackeray Reaction : धनुष्यबाण शिंदेंना मिळाल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया : ‘पैसा येतो आणि जातो... नाव जपा... मोठं करा’

एकदा का नाव गेलं की परत येत नाही... ते येऊ शकत नाही.
Eknath Shinde-Raj Thackeray
Eknath Shinde-Raj ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता ठाकरे घराण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Raj Thackeray's reaction after receiving a bow from Chief Minister Eknath Shinde's group)

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता, ते आज पुन्हा एकदा कळलं. राज यांना याबरोबरच एक व्हिडिओही ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे की, नाव आणि पैसा... पैसा येतो, पैसा जातो...पुन्हा येतो...पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही... ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही.... म्हणून नावाला जपा... नाव मोठं करा, असा तो बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील व्हिडिओ आहे.

Eknath Shinde-Raj Thackeray
Chinchwad By-Election : भाजपचं टेन्शन वाढणार; महेश लांडगेंच्या ट्विटर पोलमध्ये राष्ट्रवादीच्या काटेंना पसंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह प्रदान केले आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.

Eknath Shinde-Raj Thackeray
Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह : निवडणूक आयोगाचा निर्णय!

सत्याचा विजय : मुख्यमंत्री

निवडणूक आयोगाने लोकशाहीला धरून निर्णय दिला आहे. त्यांचे धन्यवाद. लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झाला. हा संघर्षाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयानंतर दिली आहे.

Eknath Shinde-Raj Thackeray
Shivsena Symbol : शिंदे गटाला शिवसेना मिळाल्यानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

आम्ही या निर्णयाला आव्हान देऊ : राऊत

सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य तोडून असत्यमेव जयते करावं लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेलेली आहे, हे स्पष्ट झालं. जो पक्ष बाळासाहेबांनी उभा केला, शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देवून उभा केला. तो पक्ष चाळीस बाजारबुणगे विकत घेतात, याची नोंद इतिहासात राहील. निवडणूक आयोगाने लोकांचा विश्वास गमावला. सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांना गुलाम करण्यात येत आहे. हा खोक्यांचा विजय आहे. प्रचंड पैशांची उधळण झाली, आम्ही याला आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com