राज ठाकरेंचा मेगा प्लॅन; राज्यभरात महाआरती अन् अयोध्येसाठी १० ते १२ रेल्वे भरुन मनसैनिक!

Raj Thackeray |Ayodhya tour| 'राज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे मोठी सभा होणार आहे.
राज ठाकरेंचा मेगा प्लॅन; राज्यभरात महाआरती अन् अयोध्येसाठी १० ते १२ रेल्वे भरुन मनसैनिक!
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज त्यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानी बोलावलेली पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. मध्ये अयोध्या दौरा, भोंगा वाद, राज ठाकरेंची सुरक्षा ते अक्षय्य तृतीयेला महाआरती या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

''राज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे मोठी सभा होणार आहे. ही सभा व्यवस्थित पार पडण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या राज ठाकरेंनी दिल्या आहेत. तसेच जून महिन्यातील अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले आहेत. राज ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 ट्रेन आरक्षित करण्यात येणार आहेत. रेल्वे आरक्षित करण्यासाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र लिहील्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे. त्याच बरोबर ३ मे रोजी अक्षयतृतीया आहे. या दिवशी राज्यभरात मंदिरांमध्ये महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. शिवतीर्थावर झालेल्या या बैठकीत जय श्रीरामचा नारा देण्यात आला.

Raj Thackeray
'शिवतीर्थ'वर घडामोडींना वेग; पदाधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे राज ठाकरेंचे आदेश

भोंग्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा

"राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी आणि गुप्तचर यंत्रणांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. अशी प्रतिक्रीया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. "पण हा निर्णय कधी होणार ते मी आज सांगू शकत नाही. आपण राज्य सरकारच्या मार्गदर्शक नियमावली आल्यावर निर्णय घेऊ, असेही बाळा नांदगावकरांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

मशिदीवरील भोंग्यांवरुन अल्टिमेटम दिल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने, छेड़ोगे तो छोडेंगे नही, असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनसेला दिला होता. त्यानंतर केंद्रसरकारकडून राज ठाकरे यांची सुरक्षा वाढ करण्याची शक्यता आहे. यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीण्यात आले असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.