मी धर्मांध नाही, मी धर्म अभिमानी आहे; राज ठाकरेंच्या सभेचा वादळी टिझर रिलीज

MNS| Raj Thackeray| मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये पुन्हा सभा घेणार आहेत
MNS| Raj Thackeray|
MNS| Raj Thackeray|

मुंबई : ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा आणि पुण्यात (Pune) हनुमानाची महाआरती नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangaabad) पुन्हा सभा घेणार आहेत. या सभेत ते कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. या सभेसाठी मनसेने मोठी तयारी केली. गेल्या वेळी झालेल्या सभेसाठी मनसेने टिझर प्रदर्शित केला होता आता1 मे च्या सभेसाठी ही मनसेने नवा टिझर प्रदर्शित केला आहे.

विशेष म्हणजे या टीझरमध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्याला मनसे हात घालणार असल्याचं दिसत आहे

MNS| Raj Thackeray|
'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या मागे भाजपच आहे का?'

मात्र अद्यापही औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिलेली नाही. तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत सोमवारी (25 एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये राज यांच्या सभेच्या परवानगीबाबत विचारणा केल्याची माहिती आहे.

मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांनी अजूनही सस्पेन्स कायम ठेवला आहे. सभेच्या परवानगीबाबत अर्ज करुन सहा ते सात दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर मनसे पदाधिकाऱ्यांनी मात्र मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्द्यावरुन अनेक संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली आहेत. 19 एप्रिलला दिवसभरात वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, गब्बर ॲक्शन संघटना, मौलांना आझाद विचार मंच, आणि ऑल इंडिया पँथर सेना या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com