संदीप देशपांडेंच्या अटकेचा प्रयत्न अन् राज ठाकरे खवळले; थेट उद्धव ठाकरेंना इशारा

पोलिसांच्या कारवाईनंतर राज ठाकरे Raj Thackeray आक्रमक
संदीप देशपांडेंच्या अटकेचा प्रयत्न अन् राज ठाकरे खवळले; थेट उद्धव ठाकरेंना इशारा
Raj Thackeray, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये राज ठाकरे म्हणाले, राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा थेट इशारा दिला आहे. तसेच सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), तुम्हीही नाही! असेही म्हटले आहे. (Raj Thackeray Latest News)

Raj Thackeray, Uddhav Thackeray
अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटळ पुन्हा टळली

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

Raj Thackeray, Uddhav Thackeray
"मंत्र्यांच्या P.A. ला पाकिट द्यावं लागतं" : लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याच्या कथित दाव्याने खळबळ

गेल्या आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदिंमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदिप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.