Atul Londhe : तुम्ही त्यांचा मेंदू काढला जे देशाला जोडायला निघाले ; काँग्रेसचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

Atul Londhe : "दुसऱ्यांची लायकी आणि दुसऱ्यांचा मेंदू काढणारे मेंदूहीन राज ठाकरे आज आम्हाला दिसून आले,"
Atul Londhe latest news
Atul Londhe latest newssarkarnama

Atul Londhe : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी गटाध्यक्षांचा मेळावा झाला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. (Atul Londhe news update)

"राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत, त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलायची लायकी नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, "दुसऱ्यांची लायकी आणि दुसऱ्यांचा मेंदू काढणारे मेंदूहीन राज ठाकरे आज आम्हाला दिसून आले,"

अतुल लोंढे म्हणाले, "राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळेच तुम्हाला आज हे सुचत आहे. आज तुम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्यासह सगळ्या महापुरुषांबद्दल बोललात. राहुल गांधीनी ‘भारत जोडो’च्या माध्यमातून जो प्रेमाचा संदेश दिला आहे, त्याचा हा परिणाम आहे,"

Atul Londhe latest news
Eknath Shinde : फ्रीजमधले खोके कोणी पचवले, हे ते जनतेसमोर येईल ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना इशारा

“तुम्ही राहुल गांधींचा विषय काढला. राहुल गांधी त्या घराण्यातले आहेत, ज्यांनी कधीही माफी मागितली नाही. प्रसंगी या देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान दिलं. तुम्ही त्यांचा मेंदू काढला जे देशाला जोडायला निघाले आहेत. आज तुम्ही भारताला राज्यांचा संघ बोललात, ही भाषा राहुल गांधींची आहे. त्यामुळे राज ठाकरे आता तुम्हीच सांगा कुणाला मेंदू आहे आणि कुणाला नाही?" असा सवाल अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

ठाकरे यांच्यावर टीका करताना लोंढे म्हणाले, "तुम्ही थोर महापुरुषांच्यावर होणारी चिखलफेक थांबवा म्हटले आहे. पण तुम्ही ज्या महापुरुषाचे नाव घेऊन राजकारण करत आहात त्या महापुरुषांनी धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन केले आहे,"

ज्या महापुरुषांच्या दाखले तुम्ही देता, त्या महापुरुषांनी माफी मागितल्यानंतर देशात येऊन स्वातंत्र्याचा जयघोष न करता त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला आहे.त्याच बरोबर त्यांनी इंग्रजांची गुलामगिरी करुन येथील स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात ते उभा राहिले असल्याचा इतिहासही अतुल लोंढे यांनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com