भोंगे उतरवण्यावर ठाम! वळसे पाटलांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंचा ठेंगा

Dilip Walse-Patil| Raj Thackeray| Ajit Pawar | मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
भोंगे उतरवण्यावर ठाम! वळसे पाटलांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंचा ठेंगा
Dilip Walse-Patil| Raj Thackeray|Sarkarnama

मुंबई : राज्यात भोंग्यांचा विषयावरुन राजकारण तापलं असतानाच आज राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना (Shivsena), भाजप (BJP), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress) यांच्यासह मनसे नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

या सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे नेते बाळ नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि संदीप देशपांडे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तसेच इतर पक्षनेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या बैठकीत भोंग्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dilip Walse-Patil| Raj Thackeray|
'मैं झुकेगा नहीं..' म्हणत 'मातोश्री' समोर तळ ठोकणाऱ्या आजीला मनसेनं दिले धन्यवाद!

मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आयुक्तांना प्रार्थना स्थळांवरील भोंग्याबाबत एकत्रित धोरण तयार करण्याची सूचना केली होती.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर दूसरीकडे भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन काही मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेक मौलवींनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे येत्या 3 मे नंतर राज्यात भोंग्यावरुन मोठा संघर्ष होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी एका गोपनीय अहवालाचा संदर्भ देत राज्यात 3 मे नंतर अराजकता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गृहखातंही सतर्क झालं असून कामाला लागलं आहे. राज्यावर येणाऱ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन होते. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्यांच लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.