MNS : ...म्हणून राजकीय पक्ष काढणं शक्य झालं; राज ठाकरेंनी सांगितली पक्ष काढण्यामागची प्रेरणा

Raj Thackeray : ''यश आलं तरी मी हुरळून जात नाही आणि पराभव झाला तरी कधी खचून जात नाही..''
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Maharashtra Politics : ''आज मी राजकीय पक्ष काढू शकलो, हे फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच शक्य झालं'', असं सांगत मनसे (MNS) पक्ष काढण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचीच प्रेरणा असल्याचं राज ठाकरे यांनी आज सांगितलं आहे.

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मनसे पक्ष काढण्याच्याबाबतची प्रेरणा त्यांनी सांगितली.

Raj Thackeray
Raj Thackeray : मुख्यमंत्री होण्याची सुरेश जैनांची संधी अशी हुकली; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा !

राज ठाकरे म्हणाले, "मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लहानपणापासून होतो. त्यामुळे अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. अनेक पराभव झालेले लोक बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे यायचे. तेव्हा त्यांना बाळासाहेब व्यवस्थित मार्गदर्शन करायचे''.

''निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब मी पाहिलेले आहे. वेगवेगळ्या पर्सनॅलिटी बाळासाहेबांना भेटायला यायच्या. तेव्हा त्यांच्याशी कशा पद्धतीने बाळासाहेब बोलायचे हे सर्व मी लहानपणापासून जवळून पाहिलं आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

Raj Thackeray
Devendra Fadnavis : हक्कभंगाचा आदेश काढला अन् बाळासाहेबांना विधानसभेत यावं लागलं...

''मी लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात राहिलो. त्यांच्याबरोबर राहून सर्व गोष्टी पाहू शकलो. त्यामुळेच मी स्वतःचा एक राजकीय पक्ष काढू शकलो. अन्यथा माझी हिम्मत झाली नसती. पण या सर्व गोष्टीमुळे हे सर्व शक्य झालं.''

''मात्र, यश आलं तरी मी हुरळून जात नाही आणि पराभव झाला तरी कधी मी खचून जात नाही. वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्याकडे काही आले असेल आणि जर मी काही जपलं असेल तर तो त्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे'', असं राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com