Raj Thackeray News, Eknath Shinde News,
Raj Thackeray News, Eknath Shinde News,sarkarnama

शिंदे गटाकडून प्रस्ताव आला तर नक्की विचार करेल : राज ठाकरेंचे सूचक वक्तव्य

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तोफ डागली

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय गदारोळावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी चौफेर टीका केली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तोफ डागली. (Raj Thackeray Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत ४० आमदार गेले. या विरोधात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहे. शिंदे गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गट हा मनसेमध्ये विलीन होऊ शकतो, अशी चर्चा सुरु होती. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. शिंदे गटाचे ४० आमदार मनसेमध्ये आले तर तुम्ही त्यांना पक्षात घ्याल का, असे विचारले असता, राज म्हणाले मी त्यावर विचार करेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray News, Eknath Shinde News,
सदाशिव लोखंडेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

दरम्यान, 2014 आणि 2017 मध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे विश्वास ठेवण्यासारखे नाही. बाकीच्या लोकांचे मला वाईट वाटते मात्र, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही" अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.

Raj Thackeray News, Eknath Shinde News,
उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळतात आहे, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का? यावर राज ठाकरे म्हणाले, शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचाराने बांधली गेलेली माणसे होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता. त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसे होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com