राज ठाकरेंना कोरोनाची लागण; उपचार करणारे डॉक्टर परकर म्हणाले...

दोघांनाही कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राज हे आपल्या मातोश्रीसह आज सायंकाळी सहाच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांचे डॉक्टर जलील परकर यांनी दिली. (Raj Thackeray infected with corona virus)

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. कोरोनासदृश्य लक्षण दिसू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. राज यांच्या या कोरोनाचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या आईलाही त्रास जाणवू लागल्यानेही त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनाही कोरोना विषाणूच्या संसर्गाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.

दरम्यान, कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे हे आज सायंकाळी सहाच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री देखील होत्या. दोघांनाही सौम्य लक्षण असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांचे डॉक्टर जलील परकर यांनी दिली आहे.

कोरोनाची लाट असतानासुद्धा राज ठाकरे यांना मास्कचा वापर केलेला नव्हती. मंत्रालयात सर्वपक्षीय बैठकीसाठी आलेल्या राज ठाकरे यांना पत्रकारांनी मास्क न वापरण्याबाबत विचारले होते, त्यावेळी त्यांनी तुम्ही वापरत असल्याने मी तो वापरत नाही, असे उत्तर दिले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले होते. आगामी महापालिका निवडणुका पाहता त्यांनी नाशिक आणि पुण्याचा दौरा केला होता. पुण्यात दोन दिवस मुक्काम करत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in