राज ठाकरे पुरंदरेंची कादंबरी वाचत मोठे झाले, त्यामुळे ते असेच बोलणार...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी त्यांच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख आला होता.
राज ठाकरे पुरंदरेंची कादंबरी वाचत मोठे झाले, त्यामुळे ते असेच बोलणार...
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी त्यांच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख आला होता. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी राज ठाकरे हे ब.मो. पुरंदरे यांची कादंबरी वाचत लहानाचे मोठे झाले. त्यामुळे ते असेच बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली. ( Raj Thackeray grew up reading Purandare's novels, so he will speak like this ... )

जितेंद्र आव्हाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. राज ठाकरे कधी चैत्यभूमीवर गेले आहेत का? इतिहासाशी खेळू नका. माणूस त्यात अडकून जातो. पुरंदरेंचे तेच झाले. बहुजन समाजाची पिढी शिकल्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन झाले. त्यात पुरंदरे अडकले. इतिहास हा राजकीय पक्षाचा विषय नाही. इतिहासकार गप्प बसतील तेव्हा देशाचे वाटोळे होईल. इतिहासाचे आकलन होत नाही तोपर्यंत विचार भरकटलेले असतात, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

Jitendra Awhad
टिळकांनी एकही वीट रायगडावर नेला नव्हती; चुकीचा इतिहास सांगू नका

ते पुढे म्हणाले, चुकीचा इतिहास सांगून बहुजनांची पोरे नादवायची. त्यांच्या डोळ्यात धुळफेक करायची अंधळ्या पोरांना चुकीच्या दिशेने नेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. जो फुले-शाहू-आंबेडकरांना मानतो, संविधानाचा सन्मान करतो तो संविधानाच्या विरोधात कधी बोलू शकत नाही. शिवाजी महाराजांच्या गुरूचा प्रश्न उपस्थित केला जातो. महात्मा फुले यांनीच शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात लिहून ठेवले आहे की, शिवाजी महाराजांना गुरूची अवश्यकता नाही. मालोजीराजे भोसले यांनी वारकरी संप्रदायात मुस्लीम संतांनाही आणले. यात शेख मोहम्मदही होते. त्या घराण्यात शिवाजी महाराज जन्मले. ते संस्कार त्यांच्यावर होते. राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर जेम्स लेन व पुरंदरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. शिवाजी महाराज त्यांची राजमुद्रा राजकारभारात ठराविक वेळीच वापरत. शिवाजी महाराज यांनी स्वतः लिहिलेल्या दस्तावरच राजमुद्रा असायची. दुसरी कुठेही नाही. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कुठेही वापरायची नसते. हा शिवद्रोह आहे, असा आक्षेप मंत्री आव्हाड यांनी मनसेच्या ध्वजा बाबत घेतला.

Jitendra Awhad
श्रीगोंद्यात युवक काँग्रेसने वाजविला महागाईचा भोंगा

इतिहास-भूगोलावर निष्कारण बोलू नका. भोंग्या-पोंग्यावर काय बोलायचे ते बोला. ज्या पुरंदरेंनी कादंबरी वाचत वाचत राज ठाकरे लहानाचे मोठे झाले. त्यामुळे ते असेच बोलणार. त्या राज ठाकरेंना शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे स्वराज्य हे 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन तयार केले होते. पेशवेशाही सारखी भोसलेशाही नव्हती. 18 पगड जातीचे लोक त्यांच्या बरोबर होते. त्यांच्यासाठी जीवही द्यायला तयार होते. शिवाजी महाराजांवर वार करणारा कृष्णा भास्कर हा कुलकर्णी होता. शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करायला लावणारा हिंदू तर आग्र्यात शिवाजी महाराजांच्या जागी झोपणारा मदारी मेहतर मुस्लीम होता. शाहिस्तखानाची बोटे कापणे, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे एवढाच शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी आज्ञा देणारे शिवाजी महाराज होते. मलिक अंबरने अनेक मराठा सरदारांना जहागिऱ्या दिल्या. इतिहास हा जाती धर्मावर नसतो, असेही मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.

Jitendra Awhad
चंद्रकांत पाटील म्हणाले, ईद राष्ट्रीय सण केव्हा झाला...

राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर केलेल्या टीके संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले, की मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या नावावर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रुपरेषा शरद पवार यांनीच निश्चित केली होती. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात सर्वात जास्तवेळा शरद पवार हेच स्वागताध्यक्ष होते. इतिहासात लोकांनी ब्राह्मण्यवादाला विरोध केला. ब्राह्मणांना नाही. मला एस.एम. जोशींचा मला आदर वाटतो. समाजा समाजात दुही निर्माण करण्याचा त्यांचा विरोधी पक्षांचा दुष्ट हेतू आहे, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.