Raj Thackeray Interview : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच केलं कौतुक अन् दिला 'हा' सल्ला

Amol Kolhe, Amruta Fadnavis Interview : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना दिला महत्वाचा सल्ला
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला.

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना एक-एक महत्वाचा सल्ला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले, जपून राहा. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर ते म्हणाले, वरती संबंध जपून ठेवा (केंद्रातील नेत्यांशी).

Raj Thackeray
Raj Thackeray : 'लाव रे तो व्हिडीओ'च्या सभांना जी धार होती ती अजूनही तशीच आहे का? कोल्हेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे स्पष्ट उत्तर...

अजित पवार यांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर ते म्हणाले, "मला जरा याबाबत सविस्तर बोलायचंय. अजित पवार हे जसे बाहेर लक्ष देतात तेवढं तुम्ही काकांकडे (शरद पवार यांच्याकडे) लक्ष द्या", असा सल्ला दिला.

उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल? या प्रश्नावर ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना काय सल्ला देणार? ते संयभू आहेत", असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही हाच सल्ला त्यांनी दिला.

Raj Thackeray
Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणारच, त्यांच्या तोलामोलाचा दुसरा नेता नाही हे अमित शहा यांनाही मान्य...

दरम्यान, लाव रे तो व्हिडिओला जी धार होती, ती अजूनही तशीच आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना विचारला. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ''वेळ जर आली तर पुन्हा विरोध करेनच. पण प्रत्येक वेळी विरोध करण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com