राज ठाकरेंनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक; पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर

MNS| Raj Thackeray| Political news राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरेंनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक; 
पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर
MNS| Raj Thackeray|

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Mns Raj Thackeray) यांनी आज 'शिवतीर्थ' या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे भोंग्यांबाबतचे पक्षाची आगामी काळातील भूमिका जाहीर करणार आहेत.

दरम्यान, १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मे रोजीच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला. मनसेने (MNS अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं. पण राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. रमजान ईद या सणासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

MNS| Raj Thackeray|
हे कोल्हापूर आहे! मुस्लिम बांधवांनी शिवजयंती सोहळ्यात सोडला अखेरचा रोजा

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नाबाबत चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर राज्याचे गृहखात्यातही याबाबत गंभीर चर्चा सुरू असून गृहखातही हाय अलर्टवर आले आहे. त्यामुळे राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्षाची आगामी भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.

दरम्यान, मशिदीवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर ४ मे पासून कार्यकर्त्यांनी मशिदीसमोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावावी, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेने राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापल्यानंतर राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नेहमीच्या तुलनेत 'शिवतीर्थ'बाहेर पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.राज ठाकरे यांच्या अल्टिमेटममुळे राज्यात तणाव निर्माण होऊनवातावरण बिघडू नये, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून रणनीती ठरवणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.