Money Laundering: पाचशे कोटी मनी लाँड्रींगवर राहुल कुल यांचे स्पष्टीकरण; "राऊतांनी राजकीय आकसापोटी.."

Rahul Kul On Sanjay Raut: कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकर समितीचेही अध्यक्ष आहेत.
Rahul Kul - Sanjay Raut
Rahul Kul - Sanjay RautSarkarnama

Bheema Sahakari Sugar Factory: राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी पुणे जिल्ह्यातील तालुका दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. मध्येही गैरव्यवहार होत असल्याचा दावा केला आहे.

आमदार राहुल कुल यांनी केलेला हा घोटाळा ५०० कोटींचा असल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचाही तपास भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांनी करावा, अशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. या कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकर समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना आतापर्यंत हक्कभंगाची नोटीस बजावली आहे.

Rahul Kul - Sanjay Raut
Money Laundering : मोठी बातमी : आमदार राहुल कुल यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप ; राऊतांचे फडणवीसांना पत्र

राऊतांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आमदार राहुल कुल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे, ते माध्यमांशी बोलत होते. राऊतांनी केलेले आरोप कुल यांनी फेटाळले आहेत. "राजकीय आकसापोटी, सुडबुद्धीनं राऊतांनी हे आरोप केले आहेत, " असे कुल म्हणाले.

"गेल्या २२ वर्षांपासून मी भीमा सहकारी कारखान्याचा अध्यक्ष आहे. कारखाना अडचणीत असताना मी वैयक्तीकरित्या कारखान्याला आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. राऊतांनी केलेले आरोप खरेच असतात असे नाही, मी योग्य ठिकाणी याबाबत माझी बाजू मांडणार आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे राऊतांनी हे आरोप केले आहेत," असे कुल यांनी सांगितले.

Rahul Kul - Sanjay Raut
Congress : काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा ; भाजपच्या वाटेवर..

दौंड येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी आज टि्वट करीत केला आहे. राहुल कुल यांनी या कारखान्यात ५०० कोटींचा मनी लाँड्रीग केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राहुल कुल यांची चौकशी ईडी आणि सीबीआय मार्फेत करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com