राहुल गांधींचं वक्तव्य; रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला

Ranjit Savarkar News : रणजीत सावरकर आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली?
Ranjit Savarkar and Raj Thackeray
Ranjit Savarkar and Raj ThackeraySarkarnama

Ranjit Savarkar News : काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टिकेमुळे राज्यात एका नव्या वादाला तोडं फुटले. सावरकरांवरील टिकेमुळे भाजप, मनसे, शिंदे गट चांगलेच आक्रमक झाले. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. राज आणि रणजीत सावरकर यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राहुल गांधींच्या सावरकरांवरील टिकेमुळे भाजपासह मनसे (MNS) आक्रमक झाले. मनसेने राहुल गांधीची (Rahul Gandhi) शेगाव येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही दिला होता. मात्र पोलिसांनी सभेआधीच तब्बल शंभर पेक्षा जास्त मनसैनिकांना ताब्यात घेतले. त्यामुळे राहुल गांधींची सभा विनाअडथळा पार पडली. राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आता रणजीत सावरकर आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीचे नेमके कारण काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ranjit Savarkar and Raj Thackeray
राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य; 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने के...आज गडकरी है...'

आक्रणक झालेल्या रणजीत सावरकरांनी (Ranjit Savarkar) काँग्रेसला (Congress) चांगलंच लक्ष्य केलं. 'एका महिलेसाठी जवाहरलाल नेहरूंनी देशाची फाळणी केली'' असं खळबळजनक वक्यव्य त्यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिशांना दिल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर हे सांगताना त्यांनी १९४७ च्या एका घटनेचा संदर्भ देखील दिला.

Ranjit Savarkar and Raj Thackeray
केंद्रीय तपास यंत्रणांवर ताशेरे : संजय राऊतांनंतर तेलतुंबडे प्रकरणात एनआयएला सुनावले खडे बोल

दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आज रणजीत सावरकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे रणजीत सावरकर आणि राज ठाकरेंच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली? याविषयीची कोणतीच माहिती समोर आली नाही. पण ही सदिच्छा भेट असल्याचं मनसेच्या ट्विटरवरून सांगण्यात आलंय. मात्र रणजीत सावरकर आणि राज ठाकरे यांची ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com