Sanjay Raut : राहुल गांधींचा फोन, पण जुन्या सहकाऱ्यांनी विचारपूसही केली नाही, राऊतांचा मनसे,भाजपला टोमणा

Sanjay Raut : राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आमचा विरोधच आहे," असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut and Devendra Fadanvis
Sanjay Raut and Devendra FadanvisSarkarnama

Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत हे ११० दिवसानंतर आर्थर रोड कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांची ठाकरे कुटुंबीय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींनी चौकशी केली. रविवारी रात्री काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी राऊतांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आज (सोमवारी) राऊतांनी सध्याच्या राजकारणात आलेला कडवटपणावर भाष्य केलं. ते माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut latest news)

कडवटपणात एक प्रेमाची झुळूक

राऊत म्हणाले, "सध्या राजकारणात किती कडवटपणा आला आहे, हे आपल्याला माहिती आहे. राहुल गांधींचा फोन म्हणजे अशा कडवटपणात एक प्रेमाची झुळूक म्हणता येईल. 102 दिवसांनंतर मी तुरुंगातून बाहेर आल्यावर किती लोकांनी माझी चौकशी केली याची मला माहिती आहे. माझा पक्ष, ठाकरे कुटुंबीयांनी तसेच पवार कुटुंबीयांनीही माझी चौकशी केली. मात्र, भाजप, मनसे हे आमचे जुने सहकारी. त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. त्यातील किती लोकांना माझी चिंता वाटते,"

Sanjay Raut and Devendra Fadanvis
Eknath Khadse : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; गिरीश महाजन चावट, महाजनांची एक क्लिप माझ्याकडे..

राजकारणाची एक परंपरा

"राजकारणात मतभेद थोडेफार असतातच. पण, राजकारणाची एक परंपरा आहे ती जपली आहे. राहुल गांधी यांनी ती परंपरा जपली. तसेच, वीर सावरकरांबाबत राहुल गांधींनी जे वक्तव्य केले त्याचे आम्ही समर्थन किंवा बचाव करत नाही. राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आमचा विरोधच आहे," असे राऊत म्हणाले.

आमच्यात हाच फरक..

"भाजप व आमच्यात हाच फरक आहे. आम्ही राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केले, त्याबाबत थेट भूमिका घेतली. पण, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजूनही शांत आहेत,"

शिंदे गटाला सुनावलं..

"शिवरायांबद्दल असेच वक्तव्य कुणी दुसऱ्याने केले असते तर या लोकांनी काय थयथयाट केला असता. त्यामुळेच स्वाभिमानाच्या ज्या गप्पा मिंधे गट मारतो, त्या गप्पा खऱ्या नाहीत," अशा शब्दात राऊतांनी शिंदे गटाला सुनावलं.

हीच माणुसकी

राहुल गांधी यांनी रविवारी रात्री राऊतांना फोन केला, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. राऊतांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. "भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले.राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..,"असे टि्वट राऊतांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com