Rahul Gandhi : काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला राहुल गांधींची दांडी

पक्षाचा बडा नेताच बैठकीस उपस्थित राहणार नसेल, तर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये वेगळा संदेश तर जाणार नाही ना, याकडे कॉग्रेस नेत्यांनी पाहणे गरजेचे आहे.
Rahul Gandhi News in Marathi, Congress Party News today
Rahul Gandhi News in Marathi, Congress Party News todaysarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून ‘भारत जोडो’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (ता. १४) महत्त्वपूर्ण बैठकीचे (congress meeting) आयोजन कॉग्रेसने केले आहे. या बैठकीस कॉग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) बैठकीला हजेरी लावू शकणार नाहीत. ते युरोपच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. राहुल गांधी रविवारपर्यंत मायदेशी परतण्याची शक्यता आहे. (Rahul Gandhi latest news)

ज्यावेळी कॉग्रेस पक्षाला अडचण असते, तेव्हा पक्षाला राहुल गांधींची आठवण येते, मात्र ऐन अडचणीच्या वेळेस राहुल गांधी पक्षाच्या मदतीला धावून जावू शकत नाहीत, कारण ते तेव्हा विदेश दौऱ्यावर, किंवा सहलीला गेलेले असतात. या केवळ योगायोग म्हणाला लागेल का, याबाबत राजकीय पंडितांमध्ये मतभेद आहेत.(Congress Party News today)

ऐन महत्वाच्या बैठकीला राहुल गांधी हे अनुपस्थित असतात,ते नॉटरिचेबल असतात, किंवा सहलीसाठी बाहेर गेलेले असतात. त्याचाच प्रत्यय नेहमीच येतो. उद्याच्या बैठकीस ज्येष्ठ नेते उपस्थित राहत आहेत, पण बैठकीपूर्वी राहुल गांधींनी युरोपला जाण्यासाठी बँग भरली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Rahul Gandhi News in Marathi, Congress Party News today
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंची शिंदे गटाशी हातमिळवणी

गोवा, पंजाब याठिकाणी जेव्हा पक्षाला गळती लागली होती, तेव्हा पक्षाला राहुल गांधींची मदत होती, तेव्हाही ते देशाबाहेर होते. महत्वाच्या घडामोडीच्या वेळी ते विदेशात असतात, यामुळे पक्षात त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाचा बडा नेताच बैठकीस उपस्थित राहणार नसेल, तर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये वेगळा संदेश तर जाणार नाही ना, याकडे कॉग्रेस नेत्यांनी पाहणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in