Rahul Gandhi : भाजपला घेरण्यास राहुल गांधी मैदानात; १६ दिवस महाराष्ट्रात ठाण मांडणार

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनिती Congress Election strategy आखण्यात येणार आहे. भाजपला घेरण्यासाठी To surround the BJP काँग्रेस मैदानात आक्रमक Aggressive पद्धतीने उतरणार आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

मुंबई : महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस सध्या प्रचंड आक्रमक झाली असून काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी Rahul Gandhi महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून ते तब्बल 16 दिवस महाराष्ट्रात ठाण मांडणार आहेत. भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात आक्रमक पद्धतीने उतरणार असून त्यासाठीच श्री. गांधी यांचा हा दौरा असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी जीएसटी आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याबाबत व्युहरचना आखण्यात आली. तसेच राज्यातील आगामी रणनीती याबाबत बैठकीत चर्चा केली.

Rahul Gandhi
राहूल गांधी पहिल्यांदाच येणार शिवाजी पार्कवर ?

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील दौरा होणार आहे. त्याबाबतही चर्चा करण्यात आली. या दौऱ्याचे नियोजन कसे असावे, याबाबत विचारविनिमय झाला. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती आखण्यात येणार आहे. भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात आक्रमक पद्धतीने उतरणार आहे.

Rahul Gandhi
Congress : काँग्रेसचा केंद्राविरोधात हल्लाबोल : नाना पटोलेंसह कार्यकर्ते ताब्यात

त्यासाठीच हा राहुल गांधी यांचा दौरा आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे राहुल गांधी यांचा राज्यात हा सोळा दिवसांचा दौरा आहे. महाराष्ट्रातील समन्वयाची जबाबदारी माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेसच्या बैठकीला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाड,चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in