Maharashtra Budget Session : पुण्यातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न विधानसभेत; मग पालिका काय करते ?

MLA Sunil Tingare : आमदार सुनील टिंगरेंनी उपस्थित केला मुद्दा
Sunil Tingre
Sunil TingreSarkarnama

Pune News : पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. हे कुत्रे लहान मुले, महिला, वृद्धांसह दुचाकीस्वारावर हल्ले करत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी विधानसभेत केली. यावेळी कडक नियमावली करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल असे आश्‍वासन सरकरातर्फे देण्यात आले.

Pune काही दिवसांपूर्वी खराडीतील ब्रह्मा स्काय सिटी सोसायटीमध्ये मानीत गाडेकर हा खेळताना त्याच्यावर भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अशा अनेक घटना खराडी, चंदन नगर, वडगावशेरीसह संपूर्ण शहरात घडत आहेत.

पुणे शहरात सुमारे साडेतीन लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. एक वर्षात महापालिका हद्दीत १६ हजार ५६९ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. पण फक्त १७ हजार १७८ कुत्र्यांची नसबंदी आहे. नसबंदीचे प्रमाण अत्यल्प असल्याकडेही टिंगरे (Sunil Tingare) यांनी लक्ष वेधले.

Sunil Tingre
Sanjay Raut News : ‘चंद्रकांतदादा, टोपी संभालो; आता कोथरूडमधून लढणार का’ : संजय राऊतांचा सवाल

सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी सांगितले की, "पुणे महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. चंदननगर भागामध्ये एका दीड वर्षाच्या मुलावर व ब्रम्हा सनसिटी या सोसायटीमध्ये ४-५ कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला होता. याबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन श्वान नसबंदीचा वेग वाढवावा, अशी मागणी केली."

सोसायटीमधील नागरिक श्‍वानप्रेमी आहेत, रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला दिले जाते. पण हे कुत्री त्रासदायक ठरत आहेत का, याचा विचार केला जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. महापालिकेने सोसायटीधारकांसाठी कडक नियमावली तयार करावी, अशी मागणी सभागृहात केली. यावर समिती तयार करून निर्णय होईल, असे आश्वासनही देण्यात आले, असे आमदार टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in