Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले..

Dasara Melava : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची ही परंपरा. पण यंदा हा मेळावा नेमका कोण घेणार, यावरून सध्या वाद सुरू झाला आहे.
eknath shinde, sharad pawar
eknath shinde, sharad pawarsarkarnama

Dasara Melava : मुंबई : दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा (shiv sena) दसरा मेळावा यंदा वादात सापडला आहे. दसरा मेळाव्यावरून (dasra melava) सध्या राज्यात वाद सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची ही परंपरा. पण यंदा हा मेळावा नेमका कोण घेणार, यावरून सध्या वाद सुरू झाला आहे.

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की, शिंदे गटाचा, याबाबत संभ्रम आहे. दसरा मेळाव्याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सामोपचाराने गोष्टी होईल याकडे लक्ष द्यावे,"

अजित पवार म्हणाले, "दसरा मेळ्याच्या सभेनंतर कळेल कुणामागे किती जनता आहे," या विधानाने पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

eknath shinde, sharad pawar
Ashish Shelar : "तुम्हाला "पेग्विन सेना " म्हणायचे का ? ; ठाकरेंच्या 'कमळाबाई' टीकेला शेलारांचं प्रत्युत्तर

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलं आहे.

शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? की शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित दसरा मेळावा घेणार ? यावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातायत, त्यांना दसरा मेळाव्याचे आमच्याकडून आमंत्रण दिले जाईल. राज ठाकरे देखील हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जातायत तर त्यांनादेखील आमंत्रण दिले जाईल असं सदा सरवणकर यांनी म्हटलयं.

स्थापनेपासूनच शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याविषयी आता संभ्रम निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी केली जात आहे. तर मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आता ३ दावेदार निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. या स्थितीत शिवतीर्थावर येत्या दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com