Pune News : वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर पुण्यातील आमदार एकवटले : टिंगरे म्हणतात बीआरटी नको, तर...

Pune News : खासगी बसेसला बीआरटी रूट मधून जाण्यास परवानगी द्या आमदार शिरोळेंची मागणी!
Pune News
Pune News Sarkarnama

पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उमटले आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार आणि पुणे जिल्ह्यातील विविध आमदारांनी पुण्याचा वाहतुकीच्या प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी बीआरटी, रिंग रोड , पुण्यातील रस्त्यांवरील अतिक्रमणे इत्यादी मुद्दे यावेळी विचारण्यात आले.

विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंजवडीतील वाहतुकीच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला, पवार म्हणाले,हिंजवडीतील मोठ्या मोठ्या कंपन्या हैदराबादला जात आहेत. कारण- तिथं असणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न,वाहतुकीची असुविधा, इतके मोठे प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत. यासाठी उद्याोगमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, त्या बैठकीत आम्हालाही बोलवावे. स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलवा. तिथे फार मोठ्या समस्या भेडसावत आहेत"

पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे म्हणाले,पुणे शहरातील वाहतूक सक्षम करणयासाठी, नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, यासाठी २००६ सालीप्रायोगिक तत्वावर बीआरटी योजना राबवणयात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे,हा उद्देश समोर होता.बीआरटीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला. माझ्या मतदारसंघातील नगर रोड, विश्रांतवाडी भाग विकसित करण्यात आला. बीआरटी येण्यापूर्वी नागरिकांना हा रस्ता परिपूर्ण होता. मात्र जेव्हा बीआरटी रूट झाला तेव्हा रस्त्याचा एक तृतीयांश भाग बीआरटीसाठी गेला. यामुळे आता वाहतूक कोंडी होत आहे.

Pune News
Aurangabad : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेने उद्योगमंत्री सावंत यांच्या नावाने उकळले वीस लाख..

शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, बीआरटी बंद करता येत नसेल तर, ज्या खासगी बसेस आहेत, खासगी वाहतूकीचे मोठी वाहने, त्या बीआरटी रूट मधून जाण्यास परवानगी दिली पाहिजे, तर काही प्रमाणात वाहतुकीवरील ताण कमी होईल. याच्यावरती मंत्रीमहोदयांनी विचार करावा.

हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे म्हणाले, हडपसर ते कात्रज असा एक बीआरटी रूट करण्यात आला. "हडपसरवर झाला प्रयोग, आम्हाला नाही त्याचा काही उपयोग", अशी ही बीआरटी आहे. बीआरटीचा फुलफॉर्म काहीही असेल, आमच्या नागरिकांच्या दृष्टीने 'बास रोजचा त्रास' असा आहे. बीआरटी रूटवर अनेक अपघात होतात, आजपर्यंत अनेक मृत्यू झाले. बीआरटी योजना विस्कळीत झालेली आहे. पुण्यातील रस्त्यांवर अतिक्रमणे झालेली आहेत. हे अतिक्रमण हटवणार का?

Pune News
Uddhav Thackeray on Shinde Group: "शिंदे गटातल्या आमदारांचेच भ्रष्टाचार बाहेर कसे येतात? याचा त्यांनी विचार करावा!"

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर म्हणाले, मी २००६ सालीच बीआरटीला विरोध केला होता. यासाठी आंदोलनं, निदर्शने, रास्ता रोको झाला. बीआरटी पहिल्यांदा तेव्हा स्वारगेट ते कात्रज या मार्गावर झाली. या मार्गासाठी आतापर्यंत ११० कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु आजही त्या ठिकाणी सायकल मार्गही पूर्ण क्षमतेने झालेले नाही. पादचारी मार्ग झालेला नाही. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. जो खर्च या ठिकाणी झाला, त्याचीचौकशी लावणार का?

दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल म्हणाले की, बीआरटीवर चर्चा चालू आहे, मेट्रोचीही चर्चा झाली. लक्षवेधीमध्ये रिंग रोडचीही चर्चा झाली. या परिसरमध्ये पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा,पीएमआरडीए हे तीन संस्था काम करतात, यावर काम केले जाईल का ?

दरम्यान, मंत्री उदय सावंत यांनी या प्रश्नांना सकारात्मक व पुण्यातील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करणयाची ग्वाही यावेळी दिली, मात्र बीआरटी मार्ग बंद होणार करता येणार नाही, असे ही सामंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in