PMC Elections : कुणाला तिकीट मिळणार ; अजितदादांच्या इच्छुकांना कानपिचक्या

''महापालिका निवडणुकीत उमेदवारी देतो, कामाला लाग,'' असा शब्द मी कोणालाही दिलेला नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

पुणे : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्यातील महापालिका निवडणुकांचा (Pune Municipal Corporation Elections)निर्णय होणार आहे. निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे तयारीला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्या. 'राष्ट्रवादी परिवार संवाद' उपक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित पवार (Ajit Pawar)यांनी पक्षातील (ncp) इच्छुक उमेदवारांना कानपिचक्या दिल्या. कुणाला संधी देणार, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.

अजित पवार म्हणाले, ''काही नवे चेहेरे, काही अनुभवी तर काही मध्यम वयाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, महापालिका निवडणुकीत उमेदवारी देतो, कामाला लाग असा शब्द मी कोणालाही दिलेला नाही त्यामुळे तेव्हा तुम्ही बोलला होतात असे म्हणून घरचे लग्न असल्यासारखे कोणीही रुसू नका,''

Ajit Pawar
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली!

''नव्याने प्रभाग रचना होणार म्हणून तुम्ही गाफील राहू नका. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधीही येऊ शकतो. आत्ता झालेल्या प्रभाग रचनेवर ही निवडणूक घ्या असे आदेश दिला जाऊ शकतो त्यामुळे तयारीत रहा,'' अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

Ajit Pawar
भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा

''ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान मिळण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाच आव्हान देण्यात आले आहे. त्याचा निकाल लवकरच आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील अशा भ्रमात राहू नका, निवडणुका कधीही होतील,'' असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ''पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना जास्त तर आपल्या नगरसेवकांना कमी निधी दिल्याची तक्रार याठिकाणी केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे जे विषय होते ते त्यांनी बाजूला केलेले आहेत.पण ही चूक महापालिकेत सुधारली जाईल. राज्य शासनाचे प्रतिनिधी असलेले आयुक्त सध्या प्रशासक म्हणून काम करत आहेत त्यांना सांगून ही कामे करून घेतले जातील,''

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com