"एवढे द्या, मी पोलिस स्टेशनमध्येच जामीन देतो" : PSI रंगेहाथ लाचलुचपच्या जाळ्यात

गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत विभाग पुढील तपास करत आहे.
police
policesarkarnama

मुंबई : लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने मुंबईत (Mumbai Police) पोलिस उपनिरीक्षकाला (PSI) लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. विकास लोखंडे (Vikas Lokhande) असे या उपनिरीक्षकांचे नाव आहे. पोलिस स्टेशनमध्येच जामीन मिळवून देतो असा दावा करत लोखंडेने लाचेची मागणी केली होती. अंधेरीच्या एमआयडीसी (Andheri MIDC) पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत विभाग (ACB) पुढील तपास करत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात विकास लोखंडे हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. आरोपीच्या नातेवाईकाचे जामीनासाठी प्रयत्न चालू होते. यावेळी संबंधित आरोपीला कोर्टात हजर न करता पोलिस ठाण्यातच जामीन देतो, असे सांगून २० हजारांची लाच मागितली होती. मात्र तडजोडी अंती १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले.

police
निवडणूकीपुर्वी आघाडीत ठिणगी : शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा

मात्र आरोपीच्या नातेवाईकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधितांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात उपनिरीक्षक लोखंडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत काल विभागाने सापळा रचला. त्यानुसार लोखंडे यांना १० हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याप्रकणी लोखंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपच विभाग पुढील तपास करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com