producer karan johar clarified about executive producer kshitij prasad
producer karan johar clarified about executive producer kshitij prasad

एनसीबीच्या कारवाईवर करण जोहरने केला मोठा खुलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करीत आहे. या प्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना एनसीबीने वेगाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची आज चौकशी केली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यकारी निर्मात्याला एनसीबीने अटक केली आहे. या प्रकरणी करण जोहरने आता मोठा खुलासा केला आहे. 

'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी या आठवड्यात बोलावण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. याचबरोबर अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इव्हेंट मॅनेजरही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. 

बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने एनसीबी पावले टाकत आहे. रकुल प्रीत सिंह काल चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर झाली. काल तिची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दीपिका पदुकोणची व्यवस्थापिका करिष्मा प्रकाश हिचीही काल चौकशी झाली आहे. आज पुन्हा तिची चौकशी झाली आहे. दीपिका आणि करिष्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे. दीपिकाची आज सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. याचबरोबर सारा आणि श्रद्धा यांचीही सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.  

करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता या क्षितिज प्रसाद प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एनसीबीने कालपासून त्याची चौकशी सुरू केली होती. तब्बल 24 तासांच्या चौकशीनंतर त्याला एनसीबीने आज अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

याबाबत करण जोहरने खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, मी क्षितिज प्रसाद याला व्यक्तिगत पातळीवर ओळखत नाही. तो माझा निकटवर्तीही नव्हता. धर्मा प्रॉडक्शनची उपकंपनी धर्माटिक एंटरटेन्मेंट या कंपनीत तो नोव्हेंबर 2019 मध्ये रूजू झाला होता. एका प्रकल्पासाठी कार्यकारी निर्माता म्हणून त्याची कंत्राटी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्पच पूर्णत्वास गेला नाही. 

एनसीबीने या प्रकरणी 24 सप्टेंबरला फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा आणि सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रुती मोदी यांची चौकशी केली होती. त्याआधी जया साहा हिची सलग तीन दिवस चौकशी झाली होती. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com