राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या ठरावाला पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध ?

Congress : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी काँग्रेसचे बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, असा ठराव मांडला.
Prithviraj Chavan Latest Marathi News
Prithviraj Chavan Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : अखिल भारतीय कॉंग्रेसच्या ( All Aindia Congress) अध्यक्षपदासाठी रितसर निवडणूक व्हावी, अशी सुरवातीपासून भूमिका घेतलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रदेश कॉंग्रेसच्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना बिनविरोध अध्यक्ष करावे, या ठरावाच्या बाजूने आज मतदान न करता आपला विरोध दर्शविला.

Prithviraj Chavan Latest Marathi News
मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही 300 पेक्षा जास्त जागा जिंकल्या : फडणवीसांचा दावा

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी बिनविरोध काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, असा ठराव मांडला. या ठरावाला पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले.उपस्थित इतरांनी हात वर करून समर्थन दिले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हात वर केला नाही.

Prithviraj Chavan Latest Marathi News
भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यपाल पद धोक्यात?

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी. निवडणुकीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री असलेल्या चव्हाण यांनी सुरवातीपासून मांडली आहे. आजच्या बैठकीत पक्षाचा अध्यक्ष निवडण्याचा तसेच सर्व प्रदेशाध्यक्ष तसेच कार्यकारिणी व प्रतिनिधी निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत जी-२३ नेत्यांच्या नाराज गटात सुरवातीपासूनच चव्हाण यांचा समावेश होता.आझाद यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर पक्षाला मोठा हादरा बसला होता.पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेत पक्षाहिताचा विचार करण्याचा आग्रह धरला आहे. कॉंग्रेस पक्षासाठी योग्य त्या सर्व गोष्टी पक्षाच्या नेत्यांनी करायला हव्यात अशी भूमिका चव्हाण यांनी वारंवार मांडली आहे. या पाश्‍र्वभूमीवर आजची त्यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in