पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही..

Prithviraj Chavan : सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहला, ते इंग्रज सरकारकडून पेंशनही घेत होते.
Prutvraj Chavhan
Prutvraj ChavhanSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकतंच सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधीनी जे तथ्य मांडले आहे, ते मान्य करावं लागेल पण, त्याचसोबत इतर काही त्यांनी गोष्टी केल्या होत्या, ते ही विसरता येणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एका वृर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली.

इतिहासातील पुरुषाकडे वर्तमानाच्या परिस्थितीतून मूल्यमापन करताना विशेष सावध राहिले पाहिजे. इतिहास अभ्यासक ऐतिहासिक घटनांकडे जसे पाहतात, तसंच सर्वसामान्य माणसं पाहात नाहीत. सामान्य माणूस सोयीस्कर भूमिका घेतो. आपल्याला योग्य वाटेल तेच तो पाहतो, अशाच पद्धतीने तो मत बनवत असतो. ऐतिहासिक कोणत्याही व्यक्तीमत्वाकडे पाहण्यात आलं तर, त्यांच्यामध्ये गुण-दोष आढळून येतात. मात्र याचं योग्य प्रकारे मूल्यमापन केलं गेलं पाहिजे.

Prutvraj Chavhan
काँग्रेस अॅक्शन मोडवर; भारत जोडोनंतर महाराष्ट्रात राबवणार प्लॅन बी

एखाद्यानचं काम चांगलं असेल तर त्याला चांगलंच म्हटलं गेलं पाहिजे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर काँग्रेसची सत्ता असताना, सावरकरांच्या नावाचं टपाल तिकीट प्रकाशित केलं होतं. सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहला का? तर लिहीला. ते इंग्रज सरकारकडून पेंशनही घेत होते. मात्र याकडे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर, त्यांनी जे आपलं योगदान दिलं आहे, तेही कोणालाच विसरता येणार नाही. कोणाचेही मूल्यमापन करताना ब्लॅक अँड व्हाइट, अशा पद्धतीने मूल्यमापन करू नये,' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Prutvraj Chavhan
राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य; 'शिवाजी महाराज तो पुराने जमाने के...आज गडकरी है...'

आता चव्हाण यांनी सावरकरांबद्दल घेतलेली भूमिका बचावात्मक असल्याची आता चर्चा होत आहे. राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दल केलेले वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. महाविकास आघाडीत बिघाडीत होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली होती. आता या सर्व वादावर पडदा पडावा यासाठी चव्हाणांनी आता अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com