राजकीय लढाई ही घटनात्मक पद्धतीनं लढावी ; 'आँपरेशन कमळ' चा इथं उपयोग नाही!

धार्मिक द्वेषाचं राजकारण सध्या सुरू आहे. अचानक लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत.
राजकीय लढाई ही घटनात्मक पद्धतीनं लढावी ; 'आँपरेशन कमळ' चा इथं उपयोग नाही!
Prithviraj Chavansarkarnama

पुणे : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं आहे. राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना, किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना, मशिदींवरील भोंगे या मुद्दांवरुन राजकारण तापलं आहे. सध्याच्या वातावरणबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य आणि देशासाठी हे हानिकारक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात 'सकाळ'तर्फे आयोजित राज्यातील उद्योग-व्यावसायिकांचा 'ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यावेळी उपस्थित होते.

Prithviraj Chavan
सहानुभुती मिळावी म्हणून ठाकरे सरकारनं असं केलं ; सोमय्यांच्या हल्ल्यावर फडणवीस संतप्त

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''महाराष्ट्रात दोन्ही बाजूंनी जे सध्या घडतयं ते देशासाठी हानिकारण आहे. यामागे जातीयवाद, राजकारण आहे. त्यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. एखादी निवडणुक जिंकण्यासाठी काही जणा देशाचे नुकसान करीत आहेत,''

''राज्यातील ठाकरे सरकार स्थिर राहील, याबाबत मला चिंता नाही, भाजपचे (BJP)आँपरेशन कमळ येथे उपयोगी ठरणार नाही.आणखी काही घटनात्मक पद्धतीने काही होईल का हे प्रयत्न चालू आहेत. धार्मिक द्वेषाचं राजकारण सध्या सुरू आहे. अचानक लोकांना हनुमान आणि इतर गोष्टी आठवायला लागल्या आहेत,'' अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली.

Prithviraj Chavan
देशद्रोहींवर दगड पडतातच ; गुन्हेगारांबाबत भाजपला मळमळ का ? राऊतांचा सवाल

''देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण कोण घडवत आहे. या गोष्टीचे निषेध केला पाहिजे. या गोष्टीला कोणाचा पाठिंबा आहे का ? राजकीय लढाई ही घटनात्मक लढली पाहिजे. १३५ वर्षात काँग्रेसने भूमिका जी घेतली आहे ती बदलणे शक्य नाही,''असे चव्हाण म्हणाले.

खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्यास भेटण्यास आलेल्या भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याबाबत चव्हाण म्हणाले, ''कुणाच्या ही गाडीवर हल्ला होणं हे चुकीचे आहे. राणांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली आहे, त्याबाबत पोलिस कारवाई करतील,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.