Shivtirtha | शिवतीर्थ'वर घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज

Raj Thackeray| PM Narendra Modi| राज ठाकरे तब्बल ९ वर्षांनंतर काल चंद्रपुरात दाखल झाले.
PM Narendra Modi|
PM Narendra Modi|

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) तब्बल ९ वर्षांनंतर काल चंद्रपुरात (Chandrapur) दाखल झाले. यापूर्वी २०१३ मध्ये ते चंद्रपूरला गेले होते. या सर्वांत आता महत्त्वाची बाब समोर आली आहे. या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ' या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आवाज घुमणार आहे.

आता तुम्हाला वाटेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंना भेटणार की काय? पण तसं काहीच नाही. चंद्रपूर दौऱ्यात राज ठाकरे यांनी काल भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना एक खास गिफ्ट दिलं. मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकू येणारे एक खास गिफ्ट राज ठाकरेंना दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी आता मोदींचा आवाज घुमणार असल्याची चर्चा आहे.

PM Narendra Modi|
Raj Thackeray : राज ठाकरे तब्बल ९ वर्षांनंतर चंद्रपुरात; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह...

याशिवाय मुनगंटीवार यांच्याकडून राज यांना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र आणि त्यासोबत एक राष्ट्रध्वजाचं सन्मानचिन्हही त्यांनी दिलं आहे. या सन्मान चिन्हांमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक रेकॉर्डेड भाषण त्यांना ऐकता येणार आहे,  

नागपूर ते चंद्रपूर मार्गावर खांबाडा, वरोरा, पडोली आणि चंद्रपुरमध्ये मनसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज येथे सकाळी ९.३० वाजतापासून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते ९ वर्षांनंतर आपल्या नेत्याला बघून उत्साहित झाले आहे. काल सायंकाळी येथील विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

PM Narendra Modi|
भाजप आणि शिंदे गटापुढे दोन्ही काँग्रेसची धुळधान!

दरम्यान, राज ठाकरे चंद्रपूरमध्ये विश्रामगृहाचा परिसर गेले तेव्हा कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपूर्ण फुलून गेला होता. ‘आमचे साहेब आले, आमचे दैवत आले’, असे फलक जागोजागी लावण्यात आले होते. नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्यांचे अनेक चाहते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीसाठी उत्सुक होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.

मनसेच्या सर्व सेलमधील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीसाठी जेथे ठाकरेंचा मुक्काम आहे, त्या हॉटेल एन.डी. कडे मार्गस्थ झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी ‘सरकारनाम’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com